मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर, केईएम रुग्णालयाच्या नव्याकोऱ्या आपत्कालीन विभागाच्या इमारतीला गळती; रुग्णांचे हाल

08 Jun 2018 , 09:23:05 PM

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात पावसाळा सुरू झाला की रूग्णांचे अतोनात हाल सुरू होतात. या रुग्णालयातील आपत्कालीन विभागाची इमारत बांधून अद्याप दीड वर्षही पूर्ण झालेली नाही, परंतु मुंबईच्या पहिल्याच पावसात या इमारतीचे पूर्ण छत गळत आहे. रूग्णांना या इमारतीतून तातडीने हलवावे लागले. रूग्णांच्या तपासणीसाठीही कक्ष उपलब्ध नाहीत. या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

"गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या हातात आहे. मनपा रुग्णालयात सामान्य आणि गरीब जनता उपचार घेत असते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी या आरोग्य विभागाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मनपामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. हाच भ्रष्टाचार या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी", अशी मागणी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे. गतवर्षीही केईएम रूग्णालयात पावसाळ्यात पाणी भरल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली होती. मुंबई महानगरपालिका याबाबत जबाबदारीने पावले कधी उचलणार?

संबंधित लेख