अजित पवार यांच्यामधील माणूस जीवाभावाचा

25 May 2018 , 06:29:44 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वातील जनतेच्या मदतीला नेहमीच धावून जाण्याचा पैलू  गुरूवार, २४ मे रोजी भंडारा-गोंदियाच्या सीमेवर पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिसून आला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवर तुमसर-तिरोड्याच्या वाटेवर प्रचारसभेला जाताना बिरसी फाट्यावर भीषण अपघात झाल्याचे अजित पवार यांच्या निदर्शनास आले. तातडीने त्यांनी अपघातातील जखमींना गाडीबाहेर काढून त्यांना मदतीचा हात देत त्वरीत आपल्या सोबतच्या वाहनांतून दवाखान्यात पाठवले.

भंडारा- गोंदिया पोटनिवडणूक २८ मे रोजी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यानिमित्त अजित पवार सध्या जिल्ह्यात प्रचारामध्ये व्यस्त आहेत. अशातच तिरोडच्या बिरसी फाट्याजवळून अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जात असताना तेथे दोन वाहनांमध्ये अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ते तातडीने धावून गेले. याआधीही पवार महाबळेश्वरहून परतत असताना एका जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून गेले होते. त्यावेळी त्यांनी जखमीला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले होते.

संबंधित लेख