अच्छे दिन पाहण्यासाठी चला १९ व्या शतकात...

24 May 2018 , 06:43:24 PM

कर्नाटकाच्या निवडणुकीचा निर्णय समोर आला व ओढून-ताणून सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न सपशेल फसला. आता सरकारने पुन्हा एकदा आपला हिसका जनतेला दाखवण्याचे धोरण राबविले आहे. सरकारच्या कृपेने ८२ रूपयांपर्यंत पोहोचलेल्या पेट्रोलच्या भावाने पुन्हा एकदा उसळी घेतली. आज सलग १० व्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले आहेत. २३ मे रोजी पेट्रोलच्या भावाने उच्चांक गाठला. इंधन भाववाढीमुळे दळणवळण सर्वसामान्यांसाठी अवघड होऊ लागले आहे. आता दुचाकी-चारचाकी वाहने लोडण्याला बांधून बैलगाडीचा वापर करायला सुरूवात करावी लागणार असे वाटू लागले आहे. बहुतेक अच्छे दिन १९व्या शतकात जाऊन पहावे लागणार. पेट्रोलचे भाव वाढवून तीच सफर मोदी सरकार आपल्याला देत आहेत की काय?

संबंधित लेख