राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने फोडला सरकारचा भोपळा, मंत्रालयासमोर राविकाँचे आंदोलन

21 May 2018 , 07:57:35 PM

भाजप सरकारने तरूणांना दिलेले रोजगाराचे आश्वासन पूर्णपणे फसलेले आहे. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि ओबीसी सेल ठाणे विभागाच्या वतीने सोमवार, २१ मे २०१८ रोजी मंत्रालयासमोर भोपळे फोडत आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. यावेळी राविकाँ आणि ओबीसी सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२०१४ साली लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान भाजपने प्रत्येक वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपचे सरकार येऊन चार वर्षे पूर्ण होत आली तरी अद्यापही देशातील तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाजपचे रोजगाराचे आश्वासन सामान्य तरुणांसाठी भोपळाच ठरले आहे. या सरकारने नेहमीच तरुणांचा भ्रमनिरास केला आहे तेव्हा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

संबंधित लेख