भाजपला काँग्रेस आणि जेडीएसच्या एकीने चांगला धडा शिकवला - जयंत पाटील

21 May 2018 , 07:24:40 PM

कर्नाटकमध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठी चपराक मिळाली आहे. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या भाजपला काँग्रेस आणि जेडीएसच्या एकीने चांगला धडा शिकवला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकातील राजकीय घडामोडींबाबत व्यक्त केली.

साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करायचा आणि सत्ता मिळवायची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे तंत्र देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीचे नियम पायदळी तुडवण्याचे काम ही जोडी आणि सत्ताधारी भाजप करत आहे. भाजपला फक्त सत्ता प्यारी आहे, सत्तेपलीकडे यांना काहीच दिसत नाही असे आता लोकच बोलू लागल्याचे पाटील म्हणाले. सामान्य माणूस आणि गोरगरिबांचे असंख्य प्रश्न आज प्रलंबित आहेत. पण पंतप्रधान मोदी यांना फक्त निवडणुका जिंकण्याचा छंद आहे. निवडणुकांसाठी देशातील अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीही ते नेहमी तयार असतात. हे भाजपसाठी भविष्यात घातक आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केले.  

संबंधित लेख