दंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट

16 May 2018 , 08:15:16 PM

औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आपतग्रस्त नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांततेचे आवाहन केले. तसेच दंगलीतील मृत, जखमी आणि नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई देण्याची व घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी यावेळी केली.

संबंधित लेख