खा. शरद पवार यांची सातव्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड

01 May 2018 , 12:20:31 AM

माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक, खासदार शरद पवार यांची सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी यांनी खा. शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात यावे असे अनेक प्रस्ताव विविध राज्यांतून आले होते. या पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपली होती. अध्यक्षपदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने विविध राज्यांतून आलेल्या प्रस्तावांना गृहीत धरून शरद पवार याची निवड करण्यात आली. पवार यांची पुढील तीन वर्षांसाठी (२०१८-२०२०) निवड करण्यात आली असून १० जून रोजी पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.

संबंधित लेख