परदेश वाऱ्या करण्यापेक्षा तरुणांच्या रोजगाराकडे लक्ष द्या - संग्राम कोते पाटील

23 Apr 2018 , 10:52:28 PM

देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये मग्न आहेत. पंतप्रधान महोदय, परदेश वाऱ्या करण्यापेक्षा तरुणांच्या रोजगाराकडे लक्ष द्या, असा टोला संग्राम कोते पाटील यांनी लगावला. तरुणांच्या रोजगाराप्रश्नी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. त्याच अनुषंगाने परभणी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य मोर्चा पार पडला त्यावेळी संग्राम कोते पाटील बोलत होते.


राज्यातील तरुण बेरोजगारीला कंटाळा आहे. सरकारच्या सर्व योजना फसव्या निघाल्या. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्त्या मिळालेल्या नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेस या मुद्द्यांवर तरुणांना न्याय मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा शब्दही त्यांनी दिला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, शहराध्यक्ष किरण तळेकर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख