खिसे कापून भाजपचे अच्छे दिन - संग्राम कोते पाटील

11 Jan 2018 , 07:47:59 PM

भाजप सरकार हे शेतकऱ्यांचे खिसे कापून अच्छे दिन आणण्याचे काम करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केली. परतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आ. राजेश टोपे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, पंकज बोराडे, बळीराम कडपे, भाऊसाहेब गोरे उपस्थित होते.

भाजप सरकारच्या मनमानी धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप कोते यांनी केला. आमदार टोपे यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करीत सर्व स्तरांवरील नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे सांगितले.

संबंधित लेख