तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज द्या - धनंजय मुंडे

11 Jan 2018 , 07:24:16 PM

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीही देता येते आणि मोफत वीजही देता येते. महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १६ जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंडे आज नांदेड येथे आले होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

संबंधित लेख