वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या सभेत शरद पवार यांनी केले मार्गदर्शन

28 Dec 2017 , 07:13:58 PM

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.

यंदा संपूर्ण राज्यात पर्जन्यमान चांगले झाल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये अतिरिक्त गाळप होऊन साखरेचे उत्पादन वाढेल. याचा परिणाम साखरेचे दर कमी होण्यावर होईल. त्यामुळे ऊस उत्पादकांना ऊसाचा भाव देताना देखील अडचण होईल. अशावेळी जास्तीत जास्त साखर निर्यात धोरण राबवावे लागेल, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. तसेच, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल. साखर कारखान्यांनी देखील उत्पादन खर्चात काटकसर करून शेतकऱ्यांना जास्तीचा बाजारभाव कसा देता येईल, याचा विचार करावा लागेल. वाहतूक आणि तोडणी खर्चाच्या दरात एकसमान धोरण असावे. कारखान्यापासून ऊस उत्पादकाच्या ऊसाच्या शेतीपर्यंतच्या अंतराधारे दर आकारल्यास कारखान्यांत व शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरांत विसंगती होईल. परदेशात थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल व स्पिरीट तयार केले जाते. भारतात असे करता येईल का याची पडताळणी केली, पण भारतात तसे करणे व्यवहार्य नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी आणि ऊस उत्पादकांनी विविध वर्गवाऱ्यांमध्ये बक्षिसे मिळवली. त्या विजेत्या कारखान्यांचे व शेतकऱ्यांचे पवार साहेबांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख