धनगर समाजाने सुप्रिया सुळे यांच्याकडे आरक्षणाचा मुद्दा धरून ठेवण्याची केली विनंती

11 Dec 2017 , 08:45:42 PM

आज हल्लाबोल आंदोलनाच्या दहाव्या दिवशी नागपूर येथील बुटीबोरी येथून पदयात्रेचा आरंभ झाला. मार्गात शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडत सरकारच्या निष्क्रियतेवर ओढण्यासाठी आसूड विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांना दिला. तर, धनगर समाजातील प्रतिनिधींनी खा. सुप्रिया सुळे यांना शाल व श्रीफळ देत धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्याची विनंती केली. मजल-दरमजल करत पदयात्रा आज खापरी मुक्कामी पोहचली आहे. उद्या नव्या दमाने पुढील प्रवासाला सुरुवात होईल.

संबंधित लेख