राज्यातील विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार रथ

22 Nov 2017 , 11:22:41 PM

- प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दाखवला हिरवा झेंडा

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचे अवजारे, वाहनांना जीएसटीमधून सूट मिळावी, शेतीमालाला हमी भाव मिळावा, तरुणांना रोजगार मिळावा, कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरु कराव्यात, राज्यातील लोडशेडींग बंद करावी अशा विविध मागण्यासांठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे एल्गार रथ काढण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी काल हिरवा झेंडा दाखवत या रथाची सुरूवात कोल्हापूर येथून केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या एल्गार रथाबाबत अधिक माहिती देताना संग्राम कोते पाटील म्हणाले की राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी हा रथ काढला गेला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नावीद मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० गावांना हा रथ भेट देणार असून प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सभा घेतली जाणार आहे असे ते म्हणाले.

संबंधित लेख