पुढच्या काळात परळीसह सहाच्या सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असतील - धनंजय मुंडे

19 Jun 2017 , 09:26:10 PM

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सुरू केलेल्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान आज बीड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेत्यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. याठिकाणी बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की आज संपूर्ण बीड जिल्हा राष्ट्रवादीमय झाला आहे म्हणूनच आजचा मेळावा वेगळा आहे. पुढच्या काळात परळीसह सहाच्या सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असतील. बीडला कोणत्याही लाटेची पर्वा नाही. विरोधकांनी प्रचंड पैसा वाटला तरी २५ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आल्या, लोकांचा एवढा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत यश हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं असेल अशी मेहनत आपल्याला करायची आहे, असे आवाहन मुंडे यांनी केले.

तसेच, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणाल्या की महिला आणि बाल विकास खातं हे आमच्या बीड जिल्ह्यातील चिक्कीताईकडे आहे. तरी आज राज्यात महिला सुरक्षित नाहीत. राज्यभरात महिलांवर अत्याचार होत आहे. सरकारचे या गोष्टींकडे लक्ष नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवायला हवा, असे आवाहनही त्यांनी याठिकाणी केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, निरीक्षक जीवनराव गोरे, आ. शंकर आण्णा धोंडगे, आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षिरसागर, माजी आमदार प्रकाश सोळंके व पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या मेळाव्यात शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस सुनील नाथ, मनसेचे दादासाहेब गव्हाणे, शिवसेनेचे भाऊसाहेब गावकर, विजय खंडागळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

संबंधित लेख