भाजप सरकार शेतकऱ्यांमध्ये फुट पाडू पाहत आहे - संग्राम कोते पाटील

07 Jun 2017 , 06:57:45 PM

शेतकरी संपाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे. या शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन नाशिक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या आंदोलनाला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

खोटी आश्वासनं देऊन सरकार शेतकऱ्यांमध्ये फुट पाडत आहे असा आरोप यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वाघ आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख