शेतकऱ्यांप्रती भाजप सरकार असंवेदनशील - संग्राम कोते पाटील

03 Jun 2017 , 06:04:19 PM

शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जाहीर पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जाहीर मेळावा आज धुळे येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहे. राज्य सरकारने झोपेचे सोंग न घेता राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

यावेळी माजी आमदार बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष यश कदमबांडे, जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, शहरअध्यक्ष मनोज मोरे, किरण शिंदे, किरण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सत्यजित सिसोदे, युवक शहराध्यक्ष कांतीलाल दाळवाले उपस्थित होते.

संबंधित लेख