शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे – रविंद्र पगार

08 May 2017 , 11:21:04 PM

कर्जबाजारीपणामुळे हतबल होऊन बागलाण तालुक्यातील करंजाड येथील ३० वर्षीय तरुण शेतकरी सुनिल शांताराम देवरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. देवरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार आणि इतर कार्यकर्त्यांनी घरी जाऊन भेट घेतली. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यामुळेच शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचा आरोप पगार यांनी केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार अभ्यास करत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र एकट्या नाशिक जिल्ह्यात १५ महिन्यांत सुमारे ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची भर पडल्यावर मुख्यमंत्र्यांचा अभ्यास पूर्ण होईल असा सवाल देखील यावेळी अॅड. रविंद्र पगार यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, सटाणा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संजय देवरे, दिपक देवरे, केवळ देवरे, सुरेश अहिरे, वसंत देवरे, शांताराम देवरे, गोपीनाथ देवरे, कपिल देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख