संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा सुरू

25 Apr 2017 , 07:27:28 PM

शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून कोल्हापूर येथून सुरुवात होत आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळास भेट देऊन विरोधक संघर्षयात्रेच्या नव्या पर्वाची सुरुवात करतील. यानंतर पत्रकारांशी वार्तालाप झाल्यानंतर मुधाळतिट्टा, दसरा चौक आणि जयसिंगपूर येथे दिवसभरात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याखेरीज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येऊन सरकारला धारेवर धरण्यासाठीचे पुढील धोरण आखले जाईल.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आ. हसन मुश्रीफ, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण आणि विरोधी पक्षांतील इतर सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख