कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही - शशिकांत शिंदे

24 Apr 2017 , 07:14:59 PM

संघर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात अहिंसेच्या भूमीतून झाली, दुस-या टप्प्याची सुरुवात जिजाऊंच्या जन्मस्थळापासून झाली, यापुढील तिसरा टप्पा हा छत्रपती शिवरायांच्या रायगडातून सुरू करणार, आता माघार नाही, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा नंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला दिला. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, आ. विद्या चव्हाण, हनुमंत डोळस, भाई जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुनील केदार उपस्थित होते.

संबंधित लेख