या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत? – अजित पवार

17 Apr 2017 , 11:28:00 PM

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत? असा संतप्त सवाल पवार यांनी सरकारला केला. रोज वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बातम्या वाचायला मिळतात, पण तरीही मुख्यमंत्री आम्ही अभ्यास करतोय, समिती गठीत करतोय अशी उत्तरे देतात हे वेळकाढूपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. समिती कसली गठीत करता? शेतक-यांचे किती कर्ज आहे याची आकडेवारी माहीत आहे, मग कर्जमाफी द्या अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा, आम्ही कर्जमाफी देऊ, असे आव्हान पवार यांनी दिले. यावेळी सभेस माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुनील केदार उपस्थित होते.

संबंधित लेख