संघर्षयात्रेची बुलडाणा येथे सभा

16 Apr 2017 , 12:26:35 AM

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, कर्जमाफी मिळावी अशी मागणी विरोधक गेली अडीच वर्ष करत आहेत. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत टाळाटाळ करत आहे म्हणून ही संघर्षयात्रा काढली गेली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केले. ते बुलडाणा येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे. बुलडाणा जिल्ह्याचे कृषिमंत्री लाभले असूनही प्रत्यक्ष बुलडाणा जिल्ह्यात १६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पांडुरंग फुंडकर यांनी कृषिमंत्री म्हणून काय काम केले आहे? असा प्रश्न पाटील यांनी विचारला.
 
केंद्र सरकारने नाफेडचे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकार शेतकऱ्यांना फसवण्याचे उद्योग करत आहे. फक्त महापुरुषांच्या नावावर मतं मागणं यांना जमतं. या सरकारला धडा शिकवणे गरजेचे आहे आणि म्हणून ही संघर्षयात्रा महत्त्वाची आहे. कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे पाटील म्हणाले.

संबंधित लेख