आर्थिक परिस्थितीच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या शितल वायाळ या तरुणीला विरोधी पक्षांनी वाहिली श्रद्धांजली

16 Apr 2017 , 12:06:34 AM

लग्नाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवणार नाही, वडिलांवर लग्नाच्या कर्जाचा बोजा पडू नये या कारणास्तव लातूरच्या शितल वायाळ या तरुणीने आत्महत्या केली. ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब असून या तरूणीला बुलडाणा येथील सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी शितल वायाळला श्रद्धांजली अर्पण करत कर्जमाफी झालीच पाहिजे, हा संघर्षयात्रेचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला. 

संबंधित लेख