संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शनिवारपासून प्रारंभ

15 Apr 2017 , 12:06:25 AM

शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच आग्रही राहिली असून शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका पक्षाने नेहमीच घेतली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक हलाखीमुळे जगणे नकोसे झाले आहे, पण बळीराजाची ही अवस्था पाहूनही सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावासा वाटत नाही. राज्यातील विरोधी पक्षांनी याविरोधात एकत्र येत कर्जमाफी मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा उद्या शनिवार, दिनांक १५ एप्रिलपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी बुलडाणा व जळगाव जिल्ह्यात संघर्षयात्रा जाणार आहे. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ होईल.

संबंधित लेख