संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून

13 Apr 2017 , 10:29:01 PM

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांसाठीचा हा संघर्ष पुढेही सुरूच राहणार आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून सुरु होत असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून बुलडाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यात संघर्षयात्रा पोहोचेल. १८ तारखेला संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शहापूर येथील जाहीर सभेने होईल.

संबंधित लेख