ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे सरकारविरोधात मुंडन आंदोलन

13 Apr 2017 , 06:12:51 PM

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असतानाही त्याबाबत असंवेदनशील असणाऱ्या व कर्जमाफीचा निर्णय न घेणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिनव असे मुंडन आंदोलन केले. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील भाजपचे सरकार तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी देते, मात्र राज्यातील कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत असतानाही हे सरकार कर्जमाफी करत नाही, हा राज्यातील तमाम शेतकऱ्यांचा अवमान आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी यावेळ केली. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष अभिजीत पवार यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील होते. 

संबंधित लेख