‘सन ऑफ सॉईल’ कॉफी टेबल बुकचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

04 Apr 2017 , 09:55:38 PM

ग्राहकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी उत्पादक जगला पाहिजे असे सांगत उत्पादन करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला तर आम्हाला परदेशावर अवलंबून राहावे लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. दिव्य मराठीच्या ‘सन आफ सॉईल’ या प्रगतीशील शेतकऱ्यांची यशोगाथा सांगणाऱ्या कॉफी टेबल बुकचे औरंगाबाद येथे आज पवार यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, दिव्य मराठीचे सीईओ निशीत जैन, संपादक प्रशांत दिक्षीत उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, मी अनेक शहरात कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले आहे. शहराची माहिती, देशाची तसेच उद्योगाची माहिती असलेले अनेक कॉफी टेबल बुक मी बघितले. त्यामुळे ज्ञानात भर पडते. परंतु फक्त शेतकऱ्यांची यशोगाथा दर्शवणारे कॉफी टेबल बुक ‘दिव्य मराठी’च्या वतीने काढण्यात येत असल्याचे समजल्यानंतर मी आवर्जून प्रकाशन सोहळ्याला यायचे ठरवले.

बळीराजा हा सन्मान देणारा आहे, तो सन्मानाने जगला पाहिजे. त्याला थोडी मदत झाली तर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. देशाची निती ठरवून शेतकऱ्याला नीट मदत केली तर चित्र नक्की बदलेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख