धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवार यांची भेट

04 Apr 2017 , 07:01:24 PM

मंगळवेढा येथील सभेत धनगर आरक्षणाबाबत सकल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली व त्यांना धनगर आरक्षणाबाबत निवेदन दिले. आम्हाला राज्यात सत्ता दिल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन भाजप नेत्यांनी गेल्या निवडणुकांच्या काळात दिले होते. आज भाजपचे सरकार येऊन अडीच वर्षे झाली तरी धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. धनगर समाजाच्या व्यथेची दखल घेण्यास सरकारला भाग पाडू, असे पवार यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित लेख