आमची आमदारकी गेली तरी चालेल मात्र शेतक-याला कर्जाच्या जाचातून मुक्त करा - अजित पवार

03 Apr 2017 , 07:22:10 PM

उस्मानाबाद थेथील जाहिर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लोकशाहीतही मक्तेदारी करणाऱ्या सरकारवर त्यांनी टीका केली. शेतक-यांसाठी आमची आमदारकी गेली तरी चालेल मात्र शेतक-याला कर्जाच्या जाचातून मुक्त करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सुद्धा फक्त पॅकेजची घोषणा करत उस्मानाबादला एकही रूपया न देणाऱ्या सरकारविरोधात एल्गार पुकारला.

या सभेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. पतंगराव कदम, आ.दिलीप सोपल, आ. विद्या चव्हाण आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख