आदरणीय शरद पवार यांच्या हस्ते पक्षाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

15 Dec 2015 , 05:12:49 PM

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या ७५ व्या जन्मदिवशी http://ncp.org.in/ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. १२ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत आदरणीय शरद पवार यांनी संकेतस्थळाचे उद्घाटन केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहीर, कोशाध्यक्ष हेमंत टकले, सोशल मीडिया प्रभारी आनंद परांजपे हे देखील उपस्थित होते.

या संकेतस्थळावर आम्ही राष्ट्रवादी, लेख, कार्यक्रम अशी सदरे असून यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध मुद्द्यांवरील भूमिका तसेच ताज्या घडामोडींची माहिती मिळेल. हे संकेतस्थळावरील बातम्या मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये वाचायला मिळतील. पक्षाशी संबंधित छायाचित्रांची स्वतंत्र फोटोगॅलरी संकेतस्थळावर उपलब्ध असून यामध्ये पक्षातील विविध कार्यक्रमांची तसेच नेत्यांची छायाचित्रे पाहाता येतील. पक्षातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही या संकेतस्थळावर कार्यकर्त्यांना, चाहत्यांना तसेच पत्रकारांना मिळू शकेल.

संबंधित लेख