शेतकरी जात नष्ट झाल्यावर सरकार कर्जमाफी देणार का? - अजित पवार

01 Apr 2017 , 12:30:00 AM

संघर्षयात्रेच्या तिसऱ्या दिवशी कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर कडाडून टीका केली. ८ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी हवालदिल होऊन आज आपली जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्यांना हे सरकारच जबाबदार असून अजूनही यांचे डोळे उघडत नाहीत. कर्जमाफी देण्याची यांची योग्य वेळ येणार तरी कधी? संपूर्ण शेतकरी जात नष्ट झाल्यावर हे कर्जमाफी देणार आहेत का? असा संतप्त सवाल पवार यांनी केला. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून संघर्षयात्रेच्या मार्फत जनआंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे पवार म्हणाले.

संबंधित लेख