सरकारला धडा शिकवण्यासाठी संघर्षयात्रेत आम्हाला साथ द्या – जितेंद्र आव्हाड

01 Apr 2017 , 12:19:08 AM

अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीसाठी आवाज उठवला तर आम्हाला निलंबित करून सभागृहाबाहेर काढण्यात आले, आज आम्ही जनतेच्या दारात आलो आहोत, इथून आम्हाला सरकार काढू शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी केले. ते मंगळूर आणि सेलू बाजार येथे शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नितेश राणे, अबू आझमी आणि विरोधी पक्षाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला असता महाराजांनी आपल्या रयतेसाठी सरकारी खजिना रिकामा केला होता. आज महाराजांच्या नावाने राजकारण करणारे लोक त्यांचा आशीर्वाद घेतात, मात्र त्यांच्या विचारांचे काय? शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी अंगी बाणवले आहेत का? असा प्रश्न आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना केला. विरोधकांनी जो लढा सुरू केला आहे तो सर्वसामान्यांचा लढा आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी या लढ्यात आम्हाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
 

संबंधित लेख