सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली - अजित पवार

30 Mar 2017 , 08:33:23 PM


संघर्षयात्रेदरम्यान वणी येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. तीन वर्षांपासून देशात आणि राज्यात भाजप सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली? असा सवाल त्यांनी सभेदरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्यांदाच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत संघर्षयात्रा काढली आहे. हा संघर्ष आता तुमच्या-आमच्यापर्यंत मर्यादित राहिला नसून संपूर्ण राज्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी या संघर्षयात्रेला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन पवार यांनी जनतेला केले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील,आ. जितेंद्र आव्हाड, , राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, पंतगराव कदम,बाळासाहेब थोरात , अबू आझमी, प्रा. जोगेंद्र कवाडे उपस्थित होते.

संबंधित लेख