महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी अविनाश गोविंदराव आदिक यांची नियुक्ती

24 Mar 2017 , 11:03:44 PM


महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी अविनाश गोविंदराव आदिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविनाश आदीक काम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी त्यांना नियुक्ती पत्र देताना व्यक्त केला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , गटनेते  जयंत पाटील खासदार विजयसिंह मोहीते पाटील , आमदार हनुमंत डोळस उपस्थित होते.

संबंधित लेख