आमदारांच्या निलंबनाविरोधात काळ्या फिती बांधून विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन

22 Mar 2017 , 11:52:25 PM


राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या १९ आमदारांच्या निलंबनाविरोधात काळ्या फिती बांधून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. निलंबन मागे घेतल्याशिवाय कामकाजात सहभागी होणार नाही, अशी विरोधकांची भूमिका आहे. मात्र, त्यासाठी घोषणाबाजी न करता तोंडावर काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्याचा मार्ग विरोधकांनी निवडला.
तत्पूर्वी या निलंबनाचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार लढत असताना आमच्या आमदारांना निलंबित केले, आम्ही अर्थसंकल्पावर कपात सूचना मांडली असती तर त्यात सरकारचा पराभव झाला असता आणि हा पराभव टाळण्यासाठीच सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले, असा आरोप विरोधकांनी केला. कर्जमाफी आणि निलंबनाच्या मुद्द्यावर विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला तर विधान परिषदेत विरोधक वेलमध्ये उतरल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

संबंधित लेख