आ. दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे माळीण गावचे पुनर्वसन

16 Mar 2017 , 10:09:54 PM


माळीण गावात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण गाव पुन्हा उभारण्याचे मोठे आव्हान पेलण्यात आले. सुमारे १० कोटी रुपये खर्च करून माळीणचे पुनर्वसनाचे काम झाले. देशातील सर्वात जलगदतीने पुनर्वसित होणारे माळीण हे पहिले गाव असणार आहे. या ठिकाणी घरे आणि मूलभूत सुविधा उभ्या करण्यात आला असून, माळीणवासीयांना लवकरच आपल्या हक्काचे घर प्राप्त होणे, यामुळे शक्य होणार आहे.

संबंधित लेख