यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार आधार कार्ड प्रणालीचे प्रणेते नंदन निलेकणी यांना जाहीर

14 Mar 2017 , 10:28:36 PM

अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार आधार कार्ड प्रणालीचे प्रणेते नंदन  निलकेणी  यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. स्व. यशवंतराव चव्हाण यांची १०४ वी जयंती आज साजरी करण्यात आली. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तीस 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानपत्राने' गौरविण्यात येते. आतापर्यंत देशातील १०० कोटी जनतेला ओळख प्रमाणपत्र प्राप्त करून देणाऱ्या आधार कार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पुरस्कार सोहळ्यास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, निवड समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर उपस्थित होते. भावी पिढीच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले, अशा मान्यवरांपैकी नंदन निलेकणी एक आहेत. चव्हाण साहेब हे आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार करणारे होते. आधारसारखे तंत्र त्यावेळी कुणी काढले असते तर त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करून त्याला त्यांनी सहाय्य्यच केले असते. त्यामुळे विज्ञानात रस असलेल्या दृष्ट्या नेत्याच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार योग्य व्यक्तीस मिळतो आहे, असे उद्गार यावेळी पवार यांनी काढले.

संबंधित लेख