सेल्फी पॉइण्टपेक्षा स्टडी पॉइण्ट ही काळाची गरज – सचिन अहिर

04 Mar 2017 , 06:53:03 PM


शिवाजी पार्कमध्ये सेल्फी पॉइण्टपेक्षा स्टडी पॉइण्ट असणे जास्त गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून दादरच्या शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइण्टवरून शिवसेना, भाजप, मनसे या तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. शिवाजी पार्क या परिसरात लेखक, कलावंत, नाटक क्षेत्रात काम करणारी मंडळी राहतात. त्यामुळे येथील लोकांना वाचनासाठी एक जागा उपलब्ध व्हावी म्हणून स्टडी पॉइण्टची मागणी आम्ही करत आहोत, अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली. याबाबत आमदार किरण पावसकर यांच्या आमदार निधीतून शिवाजी पार्क येथे स्टडी पॉइण्ट उभारून देण्याची मागणीही आम्ही महानगरपालिका आयुक्तांकडे करणार आहोत असे ते म्हणाले. आयुक्तांनी त्याबाबत परवानगी द्यावी अशी विनंतीही सचिन अहिर यांनी यावेळी केली.

संबंधित लेख