राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न

03 Mar 2017 , 10:51:26 PM


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार  यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे पार पडली. राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. संपूर्ण निकालाचे विश्लेषण तसेच जिल्ह्यानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. राज्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळायची असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि आजही आम्ही तीच भूमिका मांडत आहोत, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी यावेळी स्पष्ट केले

संबंधित लेख