देशाचे व राज्याचे युती सरकारने नुकसान केले - अजित पवार

11 Feb 2017 , 08:41:48 PM


देशाचे व राज्याचे युती सरकारने नुकसान केले असून सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील जाहीर सभेत पवार यांनी विरोधी पक्षांवर टिकास्त्र सोडले. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या या युती सकराने शेतकऱ्यांचा व जनतेचा भ्रमनिरास केला आहे. जादुची कांडी फिरविल्याने प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी खस्ता खाव्या लागतात,निवडणुका आल्या की केंद्र सरकार आश्वासनांचा पाऊसच पाडते. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले जात असल्याची टीका पवार यांनी केली. यावेळी माजी मंत्री,आ.राजेश टोपे ,जिल्हाध्यक्ष निसारजी देशमुख,प्रदीप सोळुंके, उत्तम पवार तसेच पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख