भाजपा सरकारमध्ये शेतकर्‍यांच्या भावना समजणारा एकही नेता नाही - धनंजय मुंडे

09 Feb 2017 , 10:12:08 PM

भाजपा सरकारमध्ये शेतकर्यांीच्या भावना समजणारा एकही नेता नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांनी जनतेची फसवणूक केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला कष्टाच्या पैशासाठी दहा-दहा तास रांगेत उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वा सनांचा सत्ताधार्यां ना विसर पडलेला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी आज केला, यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचा वाघ आता सशासारखा झाला आहे, असा टोलाही मुंडे यांनी यावेळी सेनेला लगावला.

मुंडे यांनी जातेगाव, उमापूर आणि मादळमोही येथे आज जाहिर सभा घेतल्या. यावेळी तालुक्यातील हजारो मतदार उपस्थित होते. सतत चार वर्ष दुष्काळामुळे जनता हवालदिल झाली होती, त्यातच नोटाबंदीमुळे सरकारने सर्वसामान्यांना कॅशलेस करण्याचे पाप केले. आ. अमरसिंह पंडित  अभ्यासू आणि लढवय्या आमदार आहेत, शेतकर्यांनच्या प्रश्नां वर त्यांनी सरकारला धारेवर धरले. दुष्काळात तुम्हाला पाणी देणार्यात आ.अमरसिंह पंडित यांच्या पाठिशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहून गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.

 


संबंधित लेख