राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची रावसाहेब दानवेंकडून चेष्टा – धनंजय मुंडे

24 Jan 2017 , 12:06:01 AM


"राज्यात दुष्काळच नव्हता, आम्ही ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली", हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  यांचे वक्तव्य दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर दानवेंनी केलेले वक्तव्य राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची चेष्टा करणारे असल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलने झाली, सभागृह अनेक दिवस बंद पडले, न्यायालयालाही दुष्काळ जाहीर करावा हे सांगावे लागले, हे दानवेंना माहीत नाही का ? असा खडा सवाल त्यांनी केला. तसेच दानवे आज दुष्काळ नाही म्हणतात, उद्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नाहीत असे म्हणायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

संबंधित लेख