काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मधुकर नवले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

19 Jan 2017 , 07:19:09 PM

राज्यात धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचे बळ वाढत चालले आहे. या धर्मांध शक्तींविरोधात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढा देऊ शकते, अशी भावना व्यक्त करत अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी आपल्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील , माजी मंत्री मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड उपस्थित होते.
मधुकर नवले यांनी तळागाळात खूप काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांनी सर्व चळवळींशी एक नाते जोडले आहे आणि म्हणून सर्वच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस हा जवळचा पक्ष वाटतो, अशी भावना यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार आल्यापासून जातीयवादी शक्ती पुढे येत चालल्या आहेत, त्यांना पराभूत करायचे असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल, आपण सर्वजण एकत्र येऊन या राज्यात पुन्हा फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार रुजवूया, असे आवाहन पवार यांनी केले.

संबंधित लेख