मुंबईतील जनता परिवर्तनाच्या मानसिकतेत - सचिन अहिर

18 Nov 2016 , 07:55:06 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी २०१७ मध्ये येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याचे काल मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. २० नोव्हेंबरपासून मुंबई मनपा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. मुंबईतील जनता यावेळी परिवर्तन करण्याच्या मानसिकतेत आहे असा ठाम विश्वास अहिर यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसही या परिवर्तनासाठी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार आहे. 

संबंधित लेख