नगरपालिकेच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल - संग्राम कोते पाटील

14 Nov 2016 , 08:22:05 PM

नगर जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिकांची निवडणुक सुरू होणार असून भाजपा सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगर जिल्ह्यात मोठे यश मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी आज नगर येथे बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच जनहिताची कामे केलेली आहेत. जेव्हा-जेव्हा सामान्य माणसाला त्रास झाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. भाजपा सरकारने सामान्य लोकांच्या हिताचा विचार कधीच केला नाही. भाजपा सरकार हे संपूर्णपणे उद्योगधार्जिणे सरकार आहे, असेही पाटील म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, जिल्हापरिषद सदस्य सुजित झावरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुश्री गुंड, राजेंद्र फाळके, कपिल पवार, अभिषेक खंडागळे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कुमार वाळके आदि उपस्थित होते.

संबंधित लेख