अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमणूक केलेल्यांनी बारामतीत येवून टीवटीव करू नये – अजित पवार

14 Nov 2016 , 05:38:47 PM

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर,दौंडजेजुरी भागांचा दौरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमणूक केलेल्यांनी बारामतीत येवून टीवटीव करू नये. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गुरुवारी उभारलेल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मजबूत गड असलेल्या बारामतीत येऊन चौफेर फटकेबाजी केली होती. तसेचमाळेगाव सहकारी साखर कारखान्यांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपची सत्ता आणणार अशी घोषणा केली होती. आता बारामतीत सगळ्या संस्थांवर भाजपची सत्ता येणार म्हटल्यावर दौंडकरांनो मला दुसरा मतदारसंघ शोधावा लागेलनाही का! असा सवाल पवार यांनी केला.

दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत स्थानिक नेते निर्णय घेतील. निवडणूक पक्ष चिन्हावर लढवली जाईल व समविचारी पक्षांशी युती केली जाईलअसे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित लेख