राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात कार्यकर्ता मेळावे घेणार

30 Sep 2016 , 04:52:19 PM

आगामी नगरपंचायत तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नाशिक, सातारा, नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये कार्यकर्ता मेळावे घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. या मेळाव्यांदरम्यान निवडणुकींसाठी रणनिती आखली जाईल तसेच या निवडणुकांमध्ये यश कसे संपादित करता येईल याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. मुंबई येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, मुख्य प्रवक्ते  नवाब मलिक आणि प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह उपस्थित होते.
यावेळी बोलताना, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येवून लढावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी व्हावी ही राष्ट्रवादीची इच्छा असून याबाबत काँग्रेसशी प्रथामिक चर्चा झाल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख