मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा कट रचला जात असेल तर त्यांनीच याचा खुलासा करावा-नवाब मलिक

27 Sep 2016 , 06:03:24 PM

मराठा समाजाच्या लाखोंच्या संख्येने निघत असलेल्या मूक क्रांती मोर्चांच्या निमित्ताने राज्यात मुख्यमंत्रीबदल होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना केलेय. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाल्यापासून भाजपचेच खासदार आणि मंत्री हे ब्राम्हण मुख्यमंत्री नको म्हणून हे मोर्चे निघत असल्याचे वक्तव्य करत आहेत. मोर्चेकरी वा विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसताना भाजपचेच लोक या विषयावर चर्चा करत असून भाजपकडून मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा कट रचला जात असेल तर त्यांनीच याचा खुलासा करावा, असे मलिक म्हणाले. तसेच केरळ येथील पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना काही इशारा देण्यात आला आहे का? तेही त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान मलिक यांनी केले.

संबंधित लेख