राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘समता सप्ताहा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

19 Apr 2016 , 06:00:50 PM

महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘समता सप्ताहा’ला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. १० ते १६ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने या सप्ताहाचे आयोजन करून युवकांमध्ये शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. अनेक जिल्ह्यांमध्ये या उपक्रमात पथनाट्येही सादर करण्यात आली. याद्वारे शाहू-फुले-आंबेडकरांचे सुधारणावादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात आले.

या सप्ताहाअंतर्गत शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर आधारित व्याखानांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक दिग्गजांनी सहभाग नोंदवला. त्यात श्रीपाल सबनीस, कुमार सप्तर्षी, तुषार गांधी, स्मिताताई पानसरे, कुमार केतकर, मंदार फणसे आदी वितारवंतांनी मार्गदर्शन केले.

संबंधित लेख