राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची 'सद्भावना यात्रा'

02 Mar 2016 , 02:06:49 PM

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'सद्भावना यात्रा' काढणार आहे. या उपक्रमाअंर्तगत राज्यातील सुमारे १३१० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा मदत निधी दिला जाणार आहे. मदत निधीचे वाटप राज्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. या उपक्रमाची सुरूवात येत्या ७ मार्च रोजी पुणे येथील टिळक स्मारक येथून होणार आहे. अजितदादा पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ३६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत निधीचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व माजी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या सदभावना यात्रेची सुरूवात होईल. मा. शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात विविध समाजोपयोगी उपक्रम पक्षातर्फे हाती घेण्यात आले आहेत. त्याअतंर्गत या सदभावना यात्रेचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना त्याद्वारे आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे.

संबंधित लेख