खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे पुण्याच्या नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पांचे काम फास्ट ट्रॅकवर

24 Feb 2016 , 01:59:38 PM


केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील वडगाव आणि भामा आसखेड हे जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यासंदर्भात केंद्रीय नगरविकासमंत्री श्री. व्यंकय्या नायडू यांच्याकडे लवकरात लवकर निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर झाला आहे. वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी १४.७५ कोटी तर भामा आसखेड प्रकल्पासाठी ४७.५२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी केंद्राकडून पुणे महानगरपालिकेस येत्या मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या दोन्ही प्रकल्पांचे काम जलदगतीने सुरू होऊन पुणे शहर व परिसरास शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. 

खा. सुळे यांनी हे दोन्ही प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी नगरविकास मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन सदर प्रकल्पास निधी प्राप्त होण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

संबंधित लेख